सांगली: बेडग येथे पैसे देत नसल्याने पित्याला ट्रॅक्टर खाली चिरडले; निर्दयी मुलास अटक

मिरज: पुढारी वृत्तसेवा: वडील पैसे देत नसल्याने आणि जमीन नावावर करत नसल्याच्या कारणातून मुलाने वडिलांना ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. मिरज तालुक्यामधील बेडग येथे ही घटना आज (दि. २४) सकाळी घडली. दाजी गजानन आकडे ( वय ७०) असे मृत वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी संशयित मुलगा लक्ष्मण आकळे (वय ३२) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण आकळे आणि त्याचे वडील दाजी आकळे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पैसे आणि जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता. लक्ष्मण वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी करीत होता. तसेच जमीन नावावर करण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता. पैसे देण्यास तसेच जमीन नावावर करून देण्यास वडिलांनी विरोध केल्याने लक्ष्मण याने वडिलांना आज ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारले. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
हेही वाचा