कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची इस्लामपूरला, तर सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अजित टेके यांची कोल्हापूर शहरला बदली

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा राज्यातील 262 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये 143 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोंन्नती तर 119 पोलीस उपाधीक्षकांच्या राज्यात अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर शहरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची इस्लामपूर (जिल्हा सांगली) येथे, तर सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अजित टेके यांची कोल्हापूर शहर येथे पोलीस उपाधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोरले यांची पदोन्नतीने राज्य गुन्हे अन्वेषण सीआयडी कोल्हापूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
जयकुमार कल्याणराव सोमवंशी यांची पदोन्नतीने शाहूवाडी येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.