'UPSC' निकाल : सांगलीतील संकेत गरुड आणि निहाल कोरेचे यश | पुढारी

 'UPSC' निकाल : सांगलीतील संकेत गरुड आणि निहाल कोरेचे यश

मिरज/ इस्लामपूर;पुढारी वृतसेवा : प्रशासकीय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि..२३) जाहीर झाला. यात सांगलीतील दोघांनी घवघवीत यश मिळवले आहे. कठीण आणि आव्हानात्मक अशा या परीक्षेत पुन्हा मुलींनीच बाजी मारली आहे. पहिल्या २५ टॉपर्समध्ये १४ मुलींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सुमारे ५३ हून अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.संकेत गरुड देशात ३७० वा, तर निहाल कोरे ९२२ वा आला आहे. (UPSC)

राज्यात ठाण्याची कश्मिरा संखे (रँक २५) ही पहिली आली आहे. देशातून नोएडाच्या इशिता किशोरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक गरिमा लोहिया, तिसऱ्या क्रमांकावर उमा हरती एन. असून, चौथा क्रमांक स्मृती मिश्राने पटकावला आहे. मुलांमध्ये मयूर हजारिका याने प्रथम क्रमांक पटकावला असून, तो यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

UPSC : जिल्ह्यातील दोघांचे यश 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ साली घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत जिल्ह्यातील दोघांनी यश मिळविले. इस्लामपूर येथील संकेत सुनील गरुड याने देशात गुणवत्ता यादीमध्ये ३७० वा क्रमांक व सुभाषनगर मिरज येथील निहाल प्रमोद कोरे हा देशात ९२२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

संकेत गरुड हा सध्या डेहराडून येथे आयएफएसचे प्रशिक्षण घेत आहे. त्याचे प्रशिक्षण एप्रिल २०२४ पर्यंत  असून ते आसाम, मेघालय केडरमध्ये कार्यरत आहे. संकेत है। आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील पोलिस अधीक्षक सुमीत गरुड यांचे भाऊ आहेत. संकेत यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इस्लामपूर येथे इंग्रजी माध्यमातून झाले. त्यांनी १२ वीला ९६ टक्के गुण मिळवून विभागात गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकविला होता. त्यानंतर त्यांनी पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवून सर्व शाखांमधून प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे भारत पेट्रोलियममध्ये ४ वर्षे असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी केली आहे. संकेत यांचे वडील सुनील गरुड हे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहेत. संकेत यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा बहुतांश अभ्यास हा इस्लामपूर येथे वास्तव्यास राहूनच पूर्ण केला.

टाकळीचे निहाल कोरे ९२२ वे: निहाल कोरे यांनी शालेय शिक्षण टाकळी येथे पूर्ण केले. हायस्कूलपर्यंतचे शिक्षण टाकळी-बोलवाड हायस्कूल येथे झाले. माध्यमीक शिक्षण विद्यामंदीर प्रशाला येथून तर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून पूर्ण केले आहे. निहाल कोरे हे गेल्या सात वर्षापासून केंद्रीय लोक्सेवा आयोगाची तयारी करीत होते. कोरे यांनी देशात ९२२ वा क्रमांक पटकाविला. कोरे यांनी कोणत्याही कोचींग क्लास शिवाय हे यश प्राप्त केले आहे. कोरे यांची गावातून मिरवणूक काढली.

UPSC : ‘आयएएस’साठी १८० उमेदवार पात्र

‘यूपीएससी’ने दिलेल्या माहितीनुसार, यशस्वी उमेदवारांपैकी १८० आयएएस, ३८ आयएफएस, तर २०० उमेदवार आयपीएससाठी पात्र ठरले आहेत. ‘अ’ दर्जाच्या ४७३ आणि ‘ब’ दर्जासाठी १३१ पदांसाठी निवड झाली आहे. एकूण १ हजार २२ जागांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गुणवत्ता यादी जाहीर केलेल्या ९३३ मध्ये ३४५ खुला गट, ९९ ईडब्ल्यूएस, २६३ ओबीसी, १५४ एससी, एसटी वर्गातील ७२ उमेदवार आहेत. या यादीत पहिल्या २५ क्रमांकांमध्ये चौदा मुलींचा समावेश आहे. तसेच पहिल्या शंभरात ४० हून अधिक मुली आहेत. ही नागरी सेवा पूर्व परीक्षा ५ जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ११ लाख ३५ हजार ६९७ उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यापैकी ५ लाख ७३ हजार ७३५ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ९० विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले.

देशातील टॉप १० गुणवंत

 १) इशिता किशोर २) गरिमा लोहिया ३) उमा हरती एन. ४) स्मृती मिश्रा ५) मयूर हजारिका ६) गहना नव्या जेम्स ७) वसीम अहमद ८) अनिरुद्ध यादव ९) कनिका गोयल १०) राहुल श्रीवास्तव

राज्यातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश (रँक)

दीक्षिता जोशी (५८), वसंत दाभोळकर (७६), प्रतीक जराड (११२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंदे-पाटील (१४६), ऋषीकेश शिंदे (१८३), अमर राऊत (२७७), अभिषेक दुधाळ (२७८), श्रुतिषा पाताडे (२८१), स्वप्निल पवार (२८७), अनिकेत हिरडे (३४९), संकेत गरुड (३७०), ओमकार गुंदगे (३८०), परमानंद दराडे (३९३), मंगेश खिलारी (३९६), सागर खडे (४४५), पल्लवी सांगळे (४५२), आशिष पाटील (४६३), अभिजित पाटील (४७०), शशिकांत नरवडे (४९३), प्रतिभा मेश्राम (५२७), शुभांगी केकाण (५३०), प्रशांत डगळे (५३५), लोकेश पाटील (५५२), प्रतीक्षा कदम (५६०), मानसी सकोरे (५६३), जितेंद्र कीर (५६९), अमित उंदीरवादेने (५८१), अक्षय नेर्ले (६३५), करण मोरे (६४८), अक्षय नेर्ले (६३५), प्रतीक कोरडे (६३८), करण मोरे (६४८), शिवम बुरघाटे (६५७), केतकी बोरकर (६६६), सुमेध जाधव (६८७), शिवहर मोरे (६९३), सिद्धार्थ भांगे (७००), स्वप्निल डोंगरे (७०७), उत्कर्षा गुरव (७०९), राजश्री देशमुख (७१९), अतुल ढाकणे (७३७), अक्षयकुमार पाटील (७४६), महारुद्र भोर (७५०), स्वप्निल सैंदणे (७९९), संकेत कांबळे (८१०), निखिल कांबळे (८१६), गौरव अहिरराव ८२८, श्रुती श्रोते (८५९), तुषार पवार (८६१), दयानंद तेंडोलकर (९०२), वैशाली धांडे (९०८), आरव गर्ग (९१९).

हेही वाचा 

Back to top button