सांगली बाजार समिती निवडणूक : मतमोजणीला सुरुवात; उत्सुकता शिगेला | पुढारी

सांगली बाजार समिती निवडणूक : मतमोजणीला सुरुवात; उत्सुकता शिगेला

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता मिरज येथील बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये सुरुवात झाली आहे. निकाल काय लागणार याची उत्सुकता शिगेला लागलेली असून मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होत आहेत.

बाजार समितीसाठी शुक्रवारी ९३.४५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती प्रकाश जमदाडे हे भाजप नेते तर महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दुपारी दोन पर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button