लोणी : लोकाभिमुख कामे झाल्याने आमची भीती वाटते का ? मंत्री विखे पाटील | पुढारी

लोणी : लोकाभिमुख कामे झाल्याने आमची भीती वाटते का ? मंत्री विखे पाटील

लोणी (नगर); पुढारी वृत्तसेवा : आपण अनेक वर्ष महसूल मंत्री होता? आपली बाजार समिती ही 64 वर्षापासून कार्यरत असतानाही होती. आपण काय विकास साध्य केला? आम्ही महसूल मंत्री म्हणून केलेले काम हे जनताभिमुख झाल्याने आमची तुम्हाला भीती वाटते का?असा सवाल करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाना साधत आमच्या संस्था तुमच्यापेक्षाही जादा पारदर्शक कारभार करता आहे, असे सांगून मतदार हे विरोधाकांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या सांगता प्रचार सभेत विखे पाटील बोलत होते. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. भास्कर खर्डे, माजी उपाध्यक्ष कैलासनाना तांबे, रामभाऊ भुसाळ, शांतीनाथ आहेर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कविता लहारे सर्व उमेदवार आणी मतदार उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, कोविड काळात शेतकर्‍यांना आधार दिला असे सांगून त्वरीत वजन त्वरीत पैसे, देशाच्या बाजारभावाची माहिती बाजार समितीद्वारे देतो. आपण काय करता? आमच्याकडे महाविकास आघाडी आणि तुमच्याकडे महाविकास आघाडी होत नाही का? सत्ता केवळ तुम्हाला असेच आपले धोरण आहे, असे सांगून महसूल मंत्री म्हणून वाळू धोरण, जमीनीची मोजणी, एक अर्ज अनेक दाखले हे धोरण सुरू केल्याने आपली ठेकेदारी बंद झाल्याचे दुःख आपल्याला आहे, असा निशाना साधत हा मतदारसंघ एकसंघ आहे.

यामध्ये ठराविक लोकांना हाताशी धरून राजकारण करु नका, असे सांगून जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना निवडू देण्याचे आवाहन केले. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी बाजार समिती आणि मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेत विरोधकांना थारा देऊन नका, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भास्कर खर्डे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन नंदकुमार दळे यांनी तर आभार माजी उपसभापती बबलू म्हस्के यांनी मानले. यावेळी सभासद उपस्थित होते.

आपल्या बाजार समितीवर 1 कोटी कर्ज कसे

राज्यात आलेले सरकार हे जनतेच सरकार आहे. शेतकरी हिताचे निर्णय या सरकार घेतले आहे. आपले सरकार हे माझे कुटुंब माझी जबाबदारी असेच होते. आमच्या संस्थावर टीका करताना आपल्या बाजार समितीवर 1 कोटी कर्ज कसे? सर्व सुविधा दिल्या, असे सांगता मग आपले उत्पन्न आमच्यापेक्षा कमी कसे? आम्ही 19 वर्षात शेतकरी हिताचे निर्णय घेत बाजार समिती ही प्रगती पथावर पोहचवली, असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

Back to top button