सांगली : खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल; एकजण ताब्यात | पुढारी

सांगली : खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल; एकजण ताब्यात

जत (सांगली); पुढारी वृत्तसेवा : जत येथील डॉक्टरकडून खंडणी मागणी केल्याप्रकरणी चौघांवर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित संशयित आरोपींनी मोबाईल वरून फोन करून १५ लाखाची खंडणी मागितली आहे. सदरची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी डॉ. कुलदीप आदिनाथ सावंत (रा. शंकर कॉलनी, जत) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी इराणा शिवराम भिसे (वय २७) व अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा संशियत आरोपी इराणा भिसे यास ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहरात पुन्हा खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील शंकर कॉलनी येथे सावंत यांचा दवाखाना आहे. दरम्यानच्या कालावधीत संशयित आरोपी इराणा भिसे व त्यांच्या अन्य साथीदारांनी गेल्या तीन दिवसांपासून जेवणाचा सर्व खर्च भागवा अन्यथा बघून घेऊ अशी धमकी दिली होती. तसेच पंधरा लाखाची खंडणीची मागणी केली होती. याबाबत डॉ. सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लवटे करत आहेत.

हेही वाचा;

Back to top button