

विटा; पुढारी वृत्तसेवा : औरंगजेबचा फोटो व त्यावर औरंगजेब आलमगीर आणि त्या खाली "सरकार तो बहुत सारे थे लेकिन चलाने वाला सिर्फ एक था" असे लिहून व्हाट्सएप स्टेट्स ठेवणाऱ्या एका तरुणावर विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यास अटकही करण्यात आली आहे. जमीर इलाही मुजावर (वय ३०,रा.आय.टी.आय.कॉलेज समोर,विटा) असे त्याचे नाव आहे. आळसंद (ता. खानापूर) येथील समाजसेवक राधेश्याम जाधव यांनी या प्रकरणी विटा पोलिसात तक्रार दाखल केली होती.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, काल मंगळवारी सायंकाळी विट्यातील जमीर मुजावर या तरुणाने त्याच्या व्हाट्सएप स्टेट्सवर हिंदु धर्मीयांच्या तसेच भारतीय लोकांच्या भावना दुखावण्याचे उद्देशाने तसेच हिंदू आणि मुस्लीम लोकांत शत्रूत्व वाढवणेचे उद्देशाने"औरंगजेबचा फोटो व त्यावर औरंगजेब आलमगीर आणि त्या खाली सरकार तो बहुत सारे थे लेकिन चलाने वाला सिर्फ एक था" असे लिहिलेला फोटो ठेवला होता. असे करणे चुकीचे आहे, याबद्दल लोकांनी त्याला समजावून सांगितले होते. परंतु त्याने ऐकले नाही.
अखेर आज बुधवारी आळसंद येथील सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी विटा पोलिसात धाव घेतली आणि त्यांनी थेट जमीर मुजावर याच्यावर तक्रार दाखल केली. यामध्ये आम्हा सकल हिंदु धर्माच्या लोकांच्या भावना दुखावुन हिंदुच्या मनामध्ये द्वेषाच्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे म्हंटले आहे. त्यावरून जमीन मुजावर याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम २९५ ( अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके अधिक तपास करीत आहेत.
अधिक वाचा :