सांगली – जतचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा खून, गोळीबारात जागीच मृत्यू 

सांगली – जतचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा खून, गोळीबारात जागीच मृत्यू 

जत :पुढारी वृत्तसेवा-जत नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (वय ३८) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अल्फोसा इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेजारी घडली आहे. या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी तालुक्यातून लोकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी कार्यकर्ते नातेवाईक यांचा आक्रोश हृदय पिटाळून लावणारा होता.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी तात्काळ फौजफाट्यासह दाखल झाले होते. वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिसांची अधिक कुमक मागवली आहे.

ताड यांचा खून कोणत्या कारणातून झाला आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु शाळेच्या बाजूस त्यांच्या चारचाकी गाडीवर गोळीबार केल्याचे दिसून आले आहे. यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. चारचाकीपासून शंभर फूट अंतरावर ताड हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बाजूस दगड दिसून आले आहे. नेमका गोळीबार का दगडाने ठेचून खून ते अद्याप स्पष्ट झाले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news