kitchen tiles : किचन टाईल्‍सचे हट्टी डाग; चुटकीत करा ‘असे’ साफ | पुढारी

kitchen tiles : किचन टाईल्‍सचे हट्टी डाग; चुटकीत करा 'असे' साफ

पुढारी ऑनलाईन ; स्‍वयंपाक घरातील ओटा (किचन) आपण स्‍वच्छ करतो, मात्र किचन कट्ट्यावर लावलेल्‍या टाईल्‍स (kitchen tiles) (फरशा) स्‍वच्छ करण्याकडे बऱ्याचवेळा दुर्लक्ष होते. त्‍यामुळे किचन कट्ट्याच्या भिंतीच्या टाईल्‍स वेळेवर स्‍वच्छ नाही केल्‍या, तर मात्र या टाईल्‍सवर तेलकट आणि चिकट डाग वाढतात. मग मात्र आपली डोकेदुखी वाढते. कारण हे तेलकट डाग खुप हट्‍टी असतात, ते सहजासहजी जात नाहीत. जर तुमच्या किचनच्या टाईल्‍स घाण झाल्‍या असतील, तर त्‍यावरील चिकटपणा घालवण्यासाठी काही उपाय आहेत, ते वापरून तुम्‍ही टाईल्‍स पुन्हा नव्यासारख्या चमकवू शकता त्‍यासाठी पुढील उपाय करून पहा… वाचा तर मग..

किचनच्या टाईल्‍सवर (kitchen tiles) जमा झालेला तेलकटपणा, चिकट डाग आणि धुळ यामुळे किचन ओट्यावरच्या टाईल्‍स खूप घाण दिसतात. त्‍यामुळे किचन कट्ट्याच्या सौंदर्यात देखील बाधा येते. तुमच्या घरातील किचन टाईल्‍सवरील घाण साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करून टाईल्‍स स्‍वच्छ करू शकता.

बेकिंग सोडा…

टाईल्‍सवर (kitchen tiles) जमा झालेली घाण साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एक बाउल पाणी घ्‍या, यामध्ये बेकिंग सोडा घालून तो पाण्यात निट मिसळून घ्‍या. त्‍यानंतर तो स्‍फ्रे बॉटल मध्ये भरा. यानंतर ते मिश्रण किचन टाईल्‍सवर स्‍प्रे करा. स्‍प्रे करून झाल्‍यावर १०-१५ मिनिटानंतर टाईल्‍स एका स्‍पंजच्या साहाय्याने पुसुन घ्‍या. यामुळे तुमच्या किचन टाईल्‍स स्‍वच्छ होतील.

मीठाचा वापर…

एक कापड घ्‍या. या कापडावर थोडे मीठ टाकून त्‍या कापडाने टाईल्‍स (kitchen tiles) पुसून घ्‍या. यामुळे टाईल्‍स स्‍वच्छ होण्यास मदत होईल.

लिंबू आणि बेकिंग सोडा…

किचन टाईल्‍स (kitchen tiles) स्‍वच्छ करण्यासाठी लिंबूच्या रसाचाही वापर करू शकता. यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबूचा रस मिसळून घ्‍या. यानंतर ते टाईल्‍सवर लावा. थोडे रगडून स्‍वच्छ केल्‍यावर टाईल्‍स स्‍वच्छ होतील. यानंतर टाईल्‍स पाण्याने स्‍वच्छ धुवून घ्‍या. याचा नक्‍कीच फायदा होईल.

व्हिनेगर…

व्हिनेगरच्या मदतीनेही टाईल्‍स (kitchen tiles) स्‍वच्छ करू शकता. यासाठी व्हिनगर आणि पाणी हे समप्रमाणात घ्‍या. पाण्यात व्हिनेगर मिसळा. यानंतर या मिश्रणात कापड बुडवून ते तेलकट टाईल्‍सवर रगडा. यामुळे टाईल्‍सवरील सर्व घाण तर निघुन जाईलच शिवाय टाईल्‍सला चकाकी देखील येईल.

वरील घरगुती उपायांनी तुमच्या किचन टाईल्‍स (kitchen tiles) स्‍वच्छ तर होतीलच शिवाय नव्यासारख्या चमकूही लागतील. आपण घरगुती गोष्‍टींचा वापर करून आपले घर स्‍वच्छ करू शकतो. शेवटी स्‍वच्छ घरामुळे मन आणि आरोग्‍यही उत्‍तम राहण्यास मतद होत असते.

हेही वाचा :   

Back to top button