तासगाव : सावळज गावात गव्याचे दर्शन; ग्रामस्थात दहशत

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून दुष्काळी टापूत दर्शन देणारा गवारेडा आज (शनिवार) सकाळी सावळज गावामध्ये ग्रामस्थांना पाहायला मिळाला. सिद्धेवाडी रस्त्यावर एका द्राक्ष बागेजवळ स्थानिक ग्रामस्थांना आज सकाळी गव्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आलेली आहे.
तालुका वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सावळजकडे रवाना झालेले आहेत. सिद्धेवाडी रस्त्यावरील वसंत सावंत यांच्या द्राक्ष बागेमध्ये हा गवा मुक्तपणे वावर करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
गवा रेड्या बाबत वन विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत की, कोणीही गर्दी करु नका. अन्यथा गवारेडा जास्त नुकसानकारक ठरु शकतो. आपापल्या घरी सुरक्षित रहावे. वन विभागाकडून गवा रेड्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र गावात गवा रेडा आल्याने ग्रामस्थांमध्ये कुतुहल आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
- कोचीमध्ये लॉकडाऊन? कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती; लहान मुले, वृद्ध लोक घरात कैद; जाणून घ्या कारण
- चाकण : कारमधून जाणार्या तरुणाला दगडफेक करीत कोयत्याने हल्ला
- आमदार हसन मुश्रीफ यांना दिलासा; सोमय्यांची चौकशी