चाकण : कारमधून जाणार्‍या तरुणाला दगडफेक करीत कोयत्याने हल्ला | पुढारी

चाकण : कारमधून जाणार्‍या तरुणाला दगडफेक करीत कोयत्याने हल्ला

चाकण; पुढारी वृत्तसेवा : कारमधून जाणार्‍या तरुणाला दगडफेक करीत थांबविले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री दहाच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर आयफेल सिटीसमोर घडली.
अजय आप्पासाहेब जाधव (वय 18, रा. चाकण, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार प्रवीण अशोक प्रधान (वय 18), मुक्तेश्वर संतोष दिंडे (वय 21) आणि विकी बबन येलसटे (वय 19) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह करण इंगळे (सर्व रा. चाकण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय जाधव हे त्यांच्या कारमधून तळेगाव-चाकण रस्त्याने जात होते

. ते आयफेल सिटीसमोर आले असता आरोपींनी त्यांच्या कारवर दगड मारून कार थांबवली. त्यात कारचे नुकसान झाले. त्यानंतर फिर्यादीस हाताने मारहाण केली. विकीने कोयत्याने वार करून फिर्यादींना गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत पळून जात असताना आरोपींनी पाठीमागून दगडफेक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button