सांगली : भिकवडी बुद्रुक येथे वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला मारहाण | पुढारी

सांगली : भिकवडी बुद्रुक येथे वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला मारहाण

विटा; पुढारी वृत्तसेवा : वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना भिकवडी बुद्रुक (ता. खानापूर) येथे घडली. याबाबत विटा पोलिसात संबंधित कंत्राटी वायरमन मनोज संभाजी मंडले (वय २४, रा. देविखिंडी ता. खानापूर) यांनी भिकवडी बुद्रुक येथील एकनाथ भिमराव गायकवाड याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज मंडले हे १ जानेवारी २०२३ पासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये नागेवाडीच्या सेक्शन ऑफिसमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून काम करतात. ते नागेवाडी येथील सेक्शन क्षेत्रातील भिकवडी (बु), वलखंड आणि भवरवाडी या गावातील लाईनमन राजाराम आवताडे यांच्यासोबत काम पाहत आहेत.

काल (दि.२०) सोमवारी लाईनमन आवताडे गार्डी येथे गेल्यामुळे मनोज मंडले भिकवडी बुद्रुक येथे गेले. यावेळी खताळ वस्तीवर दुपारी १२.४५ च्या दरम्यान एकनाथ गायकवाड हा बांबुच्या साह्याने वीज चोरी करीत असताना त्यांना आढळला. त्यावर मनोज यांनी आकडा काढून विजेची तार गोळा करताना एकनाथ गायकवाडने तू आमची तार काढणारा कोण ? असे म्हणत त्याने मनोज यांना ढकलून दिले. शिवाय मारहाण करत शिवीगाळही केली. याबद्दल मनोज मंडले पोलिसांत दिली आहे.

हेही वाचा;

Back to top button