Steve Smith : स्मिथच्या मते ‘हा’ युवा खेळाडू आहे क्रिकेट विश्वातील उगवता तारा

Steve Smith : स्मिथच्या मते ‘हा’ युवा खेळाडू आहे क्रिकेट विश्वातील उगवता तारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्यावरील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यानंतर स्मिथने दिलेल्या मुलाखतीत त्याला क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार कोण असा प्रश्न विचारला असता त्याने इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकचे नाव घेतले. इंग्लंडच्या ब्रुकचे नाव घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Steve Smith)

स्मिथला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. मुलाखतीत त्याला क्रिकेटचा फ्युचर सुपरस्टार शुबमन गिल की हॅरी ब्रुक यांच्यापैकी कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने इंग्लंडच्या ब्रुकचे नाव घेतले. सध्या अनेक क्रिकेट समीक्षक हे शुभमन गिलला हा येत्या काळातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मानत असताना स्मिथने ब्रुकचे नाव घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे, (Steve Smith)

गिलच्या कारकिर्द पाहिल्यावर तो नक्कीच मोठा खेळाडू होऊ शकतो. सध्या २३ वर्षांचा असलेला शुभमनने १३ कसोटी सामन्यांत शतकासह ७३६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या कठीण खेळपट्ट्यांवर त्याने आपला उत्कृष्ट खेळ दाखवला होता. केवळ त्याने २१ वनडेत ७३.७६ च्या सरासरीने १२५३ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट दुहेरी शतक देखील लगावले आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मधील त्याची कारकिर्द पाहिल्यास सरासरी ४० पेक्षा जास्त आहे. गिलने जानेवारी महिन्यात तब्बल चार आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.

तर, हॅरी ब्रुकने नुकतीच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. ब्रुकने ५ कसोटीत ७७.८७ च्या सरासरीने ६२३ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने हे सामने पाकिस्तान व न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरूद्ध खेळले आहेत. टी20 मध्ये १३७ च्या पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. आगामी आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळणार आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news