सांगली : अन् ते प्रेमी युगुल मोटारसायकलसह विहिरीत कोसळले; मुलीचा बुडून मृत्यू

तासगाव : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन प्रेमी युवक आणि युवती हे मोटारसायकलसह विहिरीत पडल्याने युवतीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला, तर युवक वाचला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील एका गावात घडली. ही घटनेमुळे खळबळ माजली आहे. या घटनेची तासगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटनेतील अल्पवयीन युवक हा तालुक्यातीलच एका गावातील आहे. तर त्याची मावशी तालुक्यातील एका गावात राहते. काही कारणाने त्याचे मावशीकडे जाणे-येणे होते. मावशीच्या जवळपास ती युवती राहत होती. यातुन त्याचे त्या मुलीशी सूत जमले.
यातून त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या. सोमवारी मध्यरात्री या प्रेमी युगलाची भेट झाली. त्यांनी गावाबाहेर जाऊन निवांत ठिकाणी जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे अल्पवयीन प्रेमी युगल गावाशेजारच्या मोकळ्या जागी जाऊन बसले. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी युवक त्या युवतीला मोटार सायकल वरून घेउन निघाला. यावेळी वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्या शेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण मोटारसायकलसह कोसळले.
युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला व अंधाऱ्या रात्री तो विहिरी बाहेर आला. पण त्या युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे अशी माहीती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेळके यांनी दिली.
हेही वाचा :
- ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा कपात करण्याचे निकष काय? अहवाल सादर करण्याचे आदेश
- New Toilet for Railway : रेल्वेतील शौचालयांचा होणार ‘कायापालट’, नवीन शौचालय कसे असणार पाहा व्हिडिओ
- Union Budget 2023 Live : आज केंद्रीय अर्थसंकल्प, निर्मला सीतारामन संसद भवनात दाखल