New Toilet for Railway : रेल्वेतील शौचालयांचा होणार ‘कायापालट’, नवीन शौचालय कसे असणार पाहा व्हिडिओ | पुढारी

New Toilet for Railway : रेल्वेतील शौचालयांचा होणार 'कायापालट', नवीन शौचालय कसे असणार पाहा व्हिडिओ

पुढारी ऑनलाइन डेस्क : New Toilet for Railway : रेल्वेतील शौचालयांचा लवकरच कायापालट होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी नवीन सध्याच्या रेल्वे कोचसाठी नवीन अद्ययावत शौचालयाचे डिझाइनची पाहणी केली आहे.

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था आहे. विशेष म्हणजे ती कोट्यावधी भारतीयांसाठी परवडणा-या दरात लांब पल्ल्याचे अंतर कापण्यासाठीची महत्वाची वाहतूक व्यवस्था आहे. मात्र, भारतीय रेल्वेतील सर्वात महत्वाची त्रुटी म्हणजे शौचालयाची निकृष्ट दर्जाची सुविधा. जी वेगाने बदलणा-या भारताच्या प्रतिमेसाठी अयोग्य आहे. New Toilet for Railway

मात्र, आता लवकरच, रेल्वेतील शौचालयाची व्यवस्था बदलणार आहे. रेल्वेतील शौचालयांचा पूर्ण कायापालट होणार आहे. रेल्वेतील शौचालयांचे भांडे अत्याधुनिक होणार आहे. New Toilet for Railway तसेच कमोडची सुविधा देखील चांगली होणार आहे. जुन्या प्रकारचे नळ सिस्टम बदलले जाणार आहे. शौचालयात चांगले बेसिन आरसा येणार आहे. प्रेशर पाइप देखील दिले जाणार आहे. शौचालयात आधुनिक पद्धतीचे हँडवॉश यंत्र जसे मॉल मल्टिप्लेक्समध्ये असतात, त्या प्रमाणे दिले जाणार आहे.

रेल्वेच्या सध्याच्या कोचसाठी डिझाइन केलेल्या नवीन अद्ययावत पद्धतीच्या शौचालयाची पाहणी करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत रेल्वेतील नवीन शौचालये कशा प्रकारचे असतील त्याचे मॉडेल दाखवण्यात आले आहे. New Toilet for Railway या व्हिडिओला 317.8 K इतके व्ह्यूव्ज मिळाले आहे. 750 पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केले असून आतापर्यंत जवळपास 7000 लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे.

दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पापूर्वी वैष्णव यांनी हे ट्विट केल्यामुळे रेल्वेतील पायाभूत सुविधांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हे ही वाचा :

Union Budget 2023 Live : आज केंद्रीय अर्थसंकल्प, निर्मला सीतारामन संसद भवनात दाखल

Union Budget 2023: ऐका एका रुपयाची कथा !; राष्ट्रीय उत्पन्नात तो येतो कसा आणि जातो कुठे ?

Back to top button