सांगली : विट्यातील बँकेची फसवणूक करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

विटा; पुढारी वृत्तसेवा : कर्जदारांना कर्ज फेडल्याचा बनावट नाहरकत दाखला देवून बँकेची फसवणूक करणा-या लक्ष्मीकांत दिगंबर भिसे (कासेगाव, ता. पंढरपूर) या व्यवस्थापकाविरूध्द बँकेचे कार्यकारी अधिकारी संजय जगन्नाथ गायकवाड (विटा) यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार २७ ऑगस्ट २०२१ रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
भिसे हे विटा येथील विटा अर्बन को. ऑप. बँकेत व्यवस्थापक या पदावर नोकरीला होते. त्यांना कोणतेही अधिकार नसताना कर्जदार सचिन बाळकृष्ण लोटके व सहकर्जदार बाळकृष्ण उध्दव लोटके यांचे बँकेचे कर्ज असताना देखील संपूर्ण कर्ज फेड केल्याचा बनावट ना हरकत दाखला भिसे यांनी कर्जदारांना देऊन बँकेची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. भिसे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिक वाचा :
- कोल्हापूर : मुले पळवणारी टोळी समजून उत्तर प्रदेशातील सांधूचा पाठलाग; मोठा अनर्थ टळला
- Maharashtra Chitrarath : महाराष्ट्राला मिळाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक
- औरंगाबाद : बदली करुन देण्यासाठी खैरेपुत्राने घेतले २ लाख; ऑडिओ क्लिप व्हायरल