सांगली : जत येथे विजेचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू

जत : पुढारी वृत्तसेवा : जत येथे घराच्या बांधकामाला विद्युत मोटारीने पाणी मारत असताना पाण्यातून विजेचा शॉक लागून महाविद्यालयीन विद्यार्थीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतोष आबासाहेब माने (वय.१७ रा. मानेवस्ती, जत)असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
घराच्या बांधकामाला पाणी मारत असताना संतोष हा बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याचे वडील आबासाहेब माने यांनी संतोषला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान युवराजचा मृत्यू झाला.
मयत संतोष हा कवठेमहांकाळ शहरातील आय. टी. आय. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षामध्ये शिकत होता. सुट्टी असल्याने तो घरी आला होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या पश्चात आई -वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
-हेही वाचा
बीड : केजमध्ये भरदुपारी महिला नायब तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न!
परभणी: पंचायत समिती आवारात सरपंच, माजी पदाधिकाऱ्यात फ्रीस्टाईल हाणामारी
वाशिम: पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी जनआक्रोश मोर्चा