सांगली : थकीत कब्जेपट्टीच्या नोटीसी विरोधात चांदोली धरणग्रस्तांचा इस्लामपुरात मोर्चा

सांगली : थकीत कब्जेपट्टीच्या नोटीसी विरोधात चांदोली धरणग्रस्तांचा इस्लामपुरात मोर्चा

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : शासनाने धरणग्रस्तांना जमीनीच्या थकीत कब्जेपट्टीची रक्कम भरण्याच्या नोटीसा काढल्या आहेत. याच्या निषेधार्थ चांदोली धरणग्रस्तांनी आज (दि१६) इस्लामपूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी नोटीसांची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला.

गौरव नायकवडी, बाळासाहेब नायकवडी, माजी जि.प. सदस्या सुषमा नायकवडी, भाई भारत पाटील, बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. प्रांत कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. शासनाने धरणग्रस्तांना जमीनीच्या लाखो रुपयांच्या थकीत कब्जेपट्टीची रक्कम भरण्याच्या नोटीसा काढल्या आहेत. या नोटीसा रद्द कराव्यात तसेच धरणग्रस्तांच्या प्रलंबीत मागण्या मार्गी लावाव्यात, या मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news