

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : स्वस्तिक वे ब्रिज जवळील कोळसा वखारीमध्ये कोळसा घेऊन आलेल्या गाडीला अचानक भीषण आग लागली. वखार बंद असल्याने स्थानिक नागरीक गजानन इसरडे यांनी फायरब्रिगेडशी संपर्क साधला. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, अग्निशमन अधिकारी विजय पवार, स्वच्छता निरिक्षक पंकज गोंधळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी फायरब्रिगेडच्या तीन गाड्याच्या सायह्याने आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा धोका टळला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा :