सांगली : आटपाडीत रविवारी पहिला गदिमा लघुपट महोत्सव | पुढारी

सांगली : आटपाडीत रविवारी पहिला गदिमा लघुपट महोत्सव

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथे पंचम फिल्म्स् प्रोडक्शनच्या मार्फत रविवारी पहिला गदिमा लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आटपाडी तालुक्यात प्रथमच गदिमा लघुपट महोत्सव होत आहे. या स्पर्धेसाठी ११० लघुपट, ८ माहितीपट, तर ५ गीतांचा सहभाग आहे.

आटपाडी येथील श्री कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात रविवारी सकाळी दहा वाजता गदिमा लघुपट महोत्सवाचे उदघाटन डॉ. एम. वाय. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजलेल्या व या महोत्सवात सहभागी झालेलया निवडक लघुपटांचे मोफत प्रदर्शन करण्यात येणार आहे. कावळा उड, यू मस्ट स्पीक, झेलम, पाम्प्लेट, दळण, पावस्या, जोडवं अशा १६ लघुपटांचा समावेश असणार आहे. संपदा अष्टेकर यांचे कथ्थक तर सोहा महेश वर्षा यांचे भरतनाटयम व शास्त्रीय नृत्य होणार आहे. सायंकाळी पाच वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक दिग्दर्शक भिमराव मुढे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी मुक्तेश्वंर माडगूळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.

.हेही वाचा 

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करण्याची मागणी

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र ; खडसे गटाला धक्का

Mumbai gangrape | मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ६ जणांना अटक 

Back to top button