Mumbai gangrape | मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ६ जणांना अटक | पुढारी

Mumbai gangrape | मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ६ जणांना अटक

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराने लोअर परळमधील त्याच्या मित्राच्या घरी नेवून त्याच्यासह मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक समोर आली आहे. याप्रकरणी बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या दोघांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. (Mumbai gangrape)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ ते साडे नऊच्या दरम्यान ही घटना घडली. यातील पीडित मुलगी घराजवळील मैदानात फिरयाला गेली असताना तिचा प्रियकर एका मित्रासोबत आला. या दोघांनी मुलीला गाडीवर बसवून लोअर परळमधील मित्राच्या घरी नेले. तेथे मुलीचा अल्पवयीन प्रियकर आणि अन्य एका मित्राने तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर पीडित मुलीने शुक्रवारी याबाबत ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. सहापैकी तीन आरोपी अल्पवयीन असून त्यांना बाल पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले. अन्य ३ आरोपींना ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Mumbai gangrape)

हेही वाचलंत का? 

Back to top button