सांगली : खानापूर तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींसाठी साडेअकरा पर्यंत २८ टक्के मतदान

सांगली : खानापूर तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींसाठी साडेअकरा पर्यंत २८ टक्के मतदान

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यात सकाळी साडेअकरापर्यंत एकूण २८ टक्के मतदान झाले. तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतसाठी एकूण १३१ मतदान केंद्रामध्ये मतदान होत आहे. सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यामध्ये खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत.

तालुक्यातील आळसंद, कमळापूर, वाझर, बलवडी (भा), जाधवनगर, भाळवणी, कळंबी, पंचलिंगनगर, घानवड, हिंगणगादे, चिखलहोळ, वलखड, कार्वे, बामणी, कुर्ली, चिंचणी (मं), घोटी बुद्रुक, मोही, करंजे, रामनगर, बलवडी, हिवरे, सुलतानगादे, बेणापूर, बाणूरगड, ताडाचीवाडी, रेवणगाव, ऐनवाडी, जखिनवाडी, जाधववाडी, लेंगरे, भांबर्डे, भूड, वेजेगाव, वाळूज, सांगोले आणि जोंधळखिंडी या ३७ गावांमधील ग्रामपंचायतीचे कारभारी निवडीसाठी मतदान होत आहे.

सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत तालुक्यात २७.९७ टक्के मतदान झाले. एकूण ६६ हजार ६८५ मतदानापैकी १८ हजार ६५२ मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला . यांत ८ हजार ३२५ महिला, १० हजार ३२७ पुरुषांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news