सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने मतदान; सकाळी साडेनऊपर्यंत १३ टक्के मतदान | पुढारी

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने मतदान; सकाळी साडेनऊपर्यंत १३ टक्के मतदान

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात चुरशीने सरासरी १३% मतदान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक कवठे महांकाळ तालुक्यात २३.८३% मतदान झाले आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रकिया शांततेत सुरू आहे.

आज ( दि. १८ ) सकाळी साडेनऊपर्यंत १० लाख ६३५०२ पैकी १ लाख ४१ हजार ४७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ५९५४६ स्त्री मतदारांनी तर ८१९२७ पुरुष मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील ३६, तासगाव तालुक्यातील २६, कवठेमहांकाळ तालुक्यातील २८, जतमधील ८१, खानापूरमधील ४५, आटपाडीतील २५, पलुसमधील १५, कडेगावमधील ४३, वाळव्यातील ८८ व शिराळ्यातील ६० ग्रामपंचायतींचा सहभाग आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्य पदांच्या ४७१६ जागांसाठी तब्बल १६ हजार ६५ उमेदवारांचे १६ हजार ४४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सरपंच पदाच्या ४४७ जागांसाठी २ हजार ४५१ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ३८ गावच्या सरपंच पदाची बिनविरोध निवड झाली. उर्वरित ४०९ जागांसाठी १ हजार १२० उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदाच्या ४ हजार ६९ जागा आहेत. त्यासाठी १४ हजार ३३० इच्छूकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ हजार ५६६ जणांनी माघार घेतली. सदस्यांच्या ५७० जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित ३ हजार ६९९ जागांसाठी ८ हजार ६०४ उमेदवार मैदानात उतरुन नशीब आजमावत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button