चाकण : बेकरी पदार्थ महागल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री

चाकण : बेकरी पदार्थ महागल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री
Published on
Updated on

चाकण; पुढारी वृत्तसेवा : बेकरी माल तयार करण्यासाठी लागणार्‍या तेल, मैदा व अन्य वस्तूंचे भाव वाढले. त्यामुळे पाव, केक आदी सर्व बेकरी उत्पादनांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. चाकण बेकरी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी 40 बेकरी व्यावसायिक हजर होते. चाकणमध्ये पावलादी सर्वाधिक विक्री होणारा पदार्थ असून, पावलादी 15 रुपयांना झाली आहे.

तेलासह सर्वच वस्तूंचे भाव भरमसाठ वाढले. वनस्पती आणि मैद्याच्या दरातही सातत्याने वाढ झाली. बेकरीतील उत्पादने बनविण्यासाठी हा प्रमुख कच्चामाल आहे. त्याच्या दरात वाढ झाल्याने बेकरी उत्पादनांच्या दरात वाढ करणे हाच पर्याय होता. त्याचा विचार करून चाकण शहरातल्या उत्पादकांनी एकत्र येऊन चर्चा केली. तीत दरवाढ करण्याचा एकमुखी निर्णय झाला. त्याचा अंमलही 15 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news