इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा ; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यात सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता पहिल्या टप्प्यात तरी मतदान प्रक्रिया शांततेत सुरु होती. निवडणुकीत कमालीची चुरस असल्याने मतदानाचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ९ सरपंच तर १३० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता सरपंच पदाच्या ७९ जागासाठी २१४ तर सदस्य पदाच्या ७९२ जागासाठी १८६४ उमेदवार रिंगणात आहेत. ४२२ मतदान केंद्रावर सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत प्रचंड सुरस असल्याने सकाळच्या सत्रात मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढून मतदान करुन घेण्यावर उमेदवारांचा भर दिसून येत होता.
अनेक गावात मतदान केंद्राबाहेर उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. तर मतदानासाठीही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागून राहिल्याचे दिसून येत आहेत. या निवडणुकीत मोठी चुरस असल्याने अनेक ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार सुरु होते. मतदान केंद्राबाहेर जमलेली गर्दी पोलीस हुसकावून लावत होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :