The aquarium burst : जर्मनीतील 82 फूट उंचीचे प्रसिद्ध मत्स्यालय फुटले!

The aquarium burst
The aquarium burst

बर्लिन : जर्मनीतील अतिशय भव्य असे काचेचे, दंडगोलाकार अ‍ॅक्वॅरियम म्हणजेच मत्स्यालय (The aquarium burst) आता फुटले आहे. त्यामुळे राजधानी बर्लिनमधील एक मोठे आकर्षण आता संपुष्टात आले आहे. बर्लिनच्या मध्यभागात असलेल्या एका हॉटेलच्या लॉबीमध्ये असलेले हे 82 फूट उंचीचे मत्स्यालय शुक्रवारी फुटले. त्यामधून एक दशलक्ष लिटर पाण्याचा लोट बाहेर पडल्याने संबंधित इमारतीचेही नुकसान झाले. दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे जर्मन पोलिसांनी सांगितले.

या मत्स्यालयात (The aquarium burst) 80 वेगवेगळ्या प्रजातींचे एक हजार पाचशे उष्ण कटिबंधीय मासे होते. 2020 मध्ये त्याचे आधुनिकीकरण केले होते. हे मत्स्यालय बर्लिनमधील एक प्रमुख पर्यटनस्थळ होते. या मत्स्यालयातून दहा मिनिटांची 'लिफ्ट राईड' हे प्रमुख आकर्षण होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी सहाच्या सुमारास हे 25 मीटर (82 फूट) उंच दंडगोलाकार मत्स्यालय फुटले. हे मत्स्यालय ज्या इमारतीत आहे, तेथे हॉटेल व कॅफेही आहेत. बर्लिनच्या अग्निशमन विभागाने सांगितले की, या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

ढिगार्‍याखाली कुणी अडकले आहेत का, याचा श्वानपथकाकडून शोध घेतला गेला. फुटलेल्या काचा व इतर ढिगारा उपसण्यात आला. रात्रभर उणे 10 अंश सेल्सिअसपर्यंतच्या गोठण बिंदूखालील तापमानामुळे या मत्स्यालयाच्या (The aquarium burst) काचेला तडा गेला होता. त्यानंतर पाण्याच्या दबावाने ते फुटल्याचा अंदाज आहे. नेमके कारण तपासले जात आहे. परंतु, घातपाताच्या घटनेचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news