सांगली : खानापूर तालुक्यातील ४५ पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध | पुढारी

सांगली : खानापूर तालुक्यातील ४५ पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध

विटा, पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.२) अखेरच्या मुदतीत सरपंचपदासाठी १९९ तर सदस्य पदासाठी ९७२ अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत असल्याने इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची मोठी झुंबड प्रशासकीय कार्यालयात उडाली होती. तालुक्यातील ४५ गावातील १४३ यातील ४२४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. तर सरपंच निवड थेट जनतेतून होत आहे. तालुक्यातील वासुंबे, माधळमुठी, धोंडगेवाडी आणि धोंडेवाडी या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

खानापूर तालुक्यातील ४५ गावातून ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. मात्र, ऑनलाईन यंत्रणा अतिशय धिम्या गतीने काम करीत असल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले होते. शासनाने ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस परवानगी दिल्याने इच्छुकांना अर्ज भरणे सोपे झाले. अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची येथील प्रशासकीय इमारतीत मोठी झुंबड उडाली होती. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असल्याने बहुतांश ठिकाणी बिनविरोधच्या शक्यता मावळताना दिसत आहेत. तर सदस्यपदासाठी देखील चुरशीने अर्ज दाखल होताना दिसत होते.

शुक्रवार अखेर तालुक्यातील ४५ गावातून सरपंच पदासाठी एकूण १९९ तर ४२४ सदस्य पदासाठी तब्बल ९७२ अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील बामणी आणि भूड या ग्रामपंचायतीमधील सरपंच पदासाठी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १२ उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर भाळवणी ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या १८ जागांसाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल ५९ अर्ज दाखल झाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button