सांगली : मासाळवाडीत मंदिरावरुन मुले खाली सोडायची आणि झेलायची प्रथा सुरूच | पुढारी

सांगली : मासाळवाडीत मंदिरावरुन मुले खाली सोडायची आणि झेलायची प्रथा सुरूच

आटपाडी (सांगली) : पुढारी वृत्तसेवा : सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मासाळवाडीमध्ये मंदिरावरुन मुले खाली सोडायची आणि झेलायची प्रथा आजही कायम आहे. महालिंगराया देवाच्या यात्रेत, नवस फेडायच्या भावनेतून मंदिरावरुन पुजारी मुले खाली सोडतो आणि खाली घोंगडीत वरुन सोडलेली मुले पकडली जातात.

नवस फेडताना मंदिरच्या छतावर पुजारी उभा असतो. तो लहान मुलांचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात पकडतो. या मुलाला खाली घोंगडी धरून उभ्या असलेल्या लोकांच्या कडे फेकतो. मुलाला झेलण्यासाठी चार लोक घोंगडी धरून लोक उभे असतात. पण अपघाताने त्या लहानग्याचा जीव जाऊ शकतो, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. अशा पद्धतीने लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार निश्चितच अंगावर शहारे उभा करणारा आहे.

पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लहान मुलांना मंदिरावरून फेकणे ही अघोरी अंधश्रद्धा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी श्यामवर्धन यांच्या पुढाकारांमध्ये सांगली जिल्ह्यातील मंदिरावरून मुले फेकणे परंपरा बंद करून त्यांना आळा घातला होता. परंतु पुन्हा ही प्रथा सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या अघोरी प्रथेकडे लक्ष द्यावे आणि तत्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Back to top button