Akasa Air : ‘आकासा एअर’च्या विमानाला पक्षी धडकला, विमानाचे नुकसान | पुढारी

Akasa Air : 'आकासा एअर'च्या विमानाला पक्षी धडकला, विमानाचे नुकसान

पुढारी ऑनलाईन डेस्क : Akasa Air : अकासा एअरलाइन्सच्या विमानाला पक्षी धडकून विमानाचे नुकसान झाल्याची घटना आज गुरुवारी घडली. अकासा (Akasa B-737-8 Max) QP-1333 हे विमान अहमदाबाद-दिल्ली दरम्यान १९०० फूट उंचीवरुन उड्डाण करत होते. या दरम्यान विमानाला पक्षी धडकला. यानंतर दिल्ली विमानतळावर हे विमान उतरल्यानंतर रेडोमचे नुकसान झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती डीजीसीएने (DGCA) दिली आहे.

Akasa Air : अकासा एअरलाइन्सच्या विमानाला पक्षी धडकून विमानाचे नुकसान झाल्याची घटना आज गुरुवारी घडली. अकासा (Akasa B-737-8 Max) QP-1333 हे विमान अहमदाबाद-दिल्ली दरम्यान १९०० फूट उंचीवरुन उड्डाण करत होते. या दरम्यान विमानाला पक्षी धडकला. यानंतर दिल्ली विमानतळावर हे विमान उतरल्यानंतर रेडोमचे नुकसान झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती डीजीसीएने (DGCA) दिली आहे.

Akasa Air : अकासा एअरलाइन्ससोबत 12 दिवसांपूर्वीच अशी एक घटना घडली आहे. 15 ऑक्टोबरला अकासा एअरलाइन्सची एक फ्लाईटने उड्डाण केल्यानंतर पुन्हा मुंबई विमानतळावर परतावे लागले होते. त्यावेळी फ्लाइटच्या केबिनमध्ये काही जळण्याचा वास येत होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला होता.

Akasa Air :  आज सकाळी अकासाच्या अहमदाबादवरून उड्डाण भरलेल्या विमानाला पुन्हा एकदा पक्ष्याची धडक बसली. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी खाली उतरले. परिणामी, विमान सविस्तर तपासणीसाठी ठेवण्यात आले आहे, असे आकासा एअरच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

अकासा एअरचे (Akasa Air) बुकिंग सुरू : पहिल्या टप्प्यात मुंबई ते अहमदाबाद मार्गावर फ्लाईटस

बेळगाव : रामदास कदम-नितीन बानुगडे पाटील यांच्या जामिनात वाढ

Back to top button