Kedarnath : केदारनाथ धामचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद | पुढारी

Kedarnath : केदारनाथ धामचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kedarnath : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्तराखंड येथील केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. अकरावे ज्योतिर्लिंग भगवान केदारनाथचे दरवाजे दरवर्षी हिवाळ्यासाठी बंद करण्यात येतात. मान्यता आहे की भगवान केदारनाथ दरवाजे बंद झाल्यावर हिमालयात हिवाळ्यात सहा महिने तपस्या करतात. त्यामुळे हिवाळ्यासाठी भगवान केदारनाथचे दरवाजे आज सकाळी 8.20 च्या दरम्यान हिमालयातील या प्रसिद्ध मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.

Kedarnath : यावेळी स्थानिक वाद्यांनी संगीत वाजवण्यात आले. आर्मी बँडचे सूर आणि असंख्य भाविकांच्या जयजयकारासह वैदिक स्तोत्रांच्या जपाने संपूर्ण विधीनुसार बंद करण्यात आले होते.

आज सकाळी साडेआठ वाजता भक्तगण आणि भाविकांच्या जयघोषात भगवान केदारनाथची पालखी मंडपातून मंदिराच्या आवारात आणण्यात आली. मुख्य मंदिराच्या तीन वेळा प्रदक्षिणा केल्यानंतर पालखी मिरवणुकीत उखीमठ येथी ओकारेश्वर मंदिराच्या हिवाळी आसनावर नेण्यात आली.

Kedarnath : केदारनाथ धाम हे हिंदू धर्मीयांच्या मान्यतेनुसार चारधाम पैकी एक आहे. आता चारधाम यात्रा सुरू झाल्यानंतर केदारनाथचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा उघडले जाईल. यावर्षी अक्षय्य तृतीयेला 3 मे रोजी चारधाम यात्रा सुरू झाली होती. तर केदारनाथ मंदिराचे दरवाजे 6 मे रोजी उघडण्यात आले होते. आता पुढील वर्षी जेव्हा चार धाम यात्रा सुरू होईल तेव्हा केदारनाथ मंदिराचे दरवाजे पारंपारिक पद्धतीने मंत्रांच्या जपासह उघडले जातील.

Kedarnath : दरवाजे बंद करण्यापूर्वी केदारनाथ धामचे गर्भगृह सोन्याने सजवले

एएनआयने याविषयी माहिती दिली आहे. यापूर्वी २६ ऑक्टोबरला केदारनाथ धामचे गर्भगृह सोन्याने सजवण्यात आले होते. गर्भगृहाच्या भिंती आणि छताला 550 सोन्याच्या थरांनी नवे रूप देण्यात आले. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या सुवर्ण सजावटीचे काम बुधवारी सकाळी पूर्ण झाले.

IIT रुरकी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च रुरकी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या सहा सदस्यीय टीमने केदारनाथ धामला भेट दिली आणि मंदिराच्या गर्भगृहाची पाहणी केली. या तज्ज्ञांच्या अहवालानंतरच केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचे अस्तर लावण्याचे काम सुरू झाले होते.

Back to top button