Shivaji University : आटपाडीत शिवाजी विद्यापीठाचा ४२ वा मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन | पुढारी

Shivaji University : आटपाडीत शिवाजी विद्यापीठाचा ४२ वा मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठ आणि आटपाडीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांचा विद्यापीठाचा ४२ वा मध्यवर्ती युवा महोत्सव १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. याची माहिती युवा महोत्सव स्थानिक संयोजन समितीचे अध्यक्ष तथा प्राचार्य विजय लोंढे यांनी दिली. (Shivaji University)

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, स्वर्गीय बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या युवा महोत्सवाचे उद्घाटन रविवार दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, तहसीलदार बी. एस. माने, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे हे उपस्थित राहणार आहेत.  (Shivaji University)

महोत्सवाचा समारोप मंगळवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग संचालक प्रा.डॉ.आर.व्ही.गुरव, दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख, उपाध्यक्ष प्रा.डॉ.सुभाष कारंडे, सचिव एच.यू.पवार, निरीक्षक अशोक चौगुले यांची प्रमुख उपस्थिती आहे.

मुख्य स्टेज, जिमनॅशीयम हॉल, सेमिनार हॉल, भारते मंगल कार्यालय, महाविद्यालय परिसरात रविवारी भारतीय समूहगीत, मुकनाट्य, नकला, लोककला, लघुनाटीका, एकपात्री अभिनय, सुगम गायन, शास्त्रीय गायन, पथनाट्य, वक्तृत्व, वादविवाद, व्यंगचित्र, कातरकाम, मेहंदी, रांगोळी, प्रश्नमंजुषा, शास्त्रीय नृत्य स्पर्धा होणार आहेत.

सोमवारी पाश्चिमात्य समूहगीत, वाद्यवादन, लोकसंगीत वाद्यवृंद, लोकनृत्य, एकांकिका, शास्त्रीय नृत्य, पाश्चिमात्य एकल गायन, शास्त्रीय सूरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य, स्थळ छायाचित्र, स्थळ चित्र, सांधिक रचनाकृती, भित्तीचित्र निर्मिती, मातीकाम स्पर्धा तर मंगळवारी माजी विद्यार्थी संम्मेलन आणि महोत्सवाचा समारोप होणार आहे.

हेही वाचा;

Back to top button