Cartoon Network संकटात : कंपनीच्या या निर्णयामुळे कार्टूनप्रेमी वाहत आहेत चॅनलला श्रद्धांजली
कार्टून नेटवर्क संकटात : ट्विटरवर RIP Cartoon Networkचा ट्रेंड

पुढारी ऑनलाईन – वॉर्नर ब्रदर्स अॅनिमेशन आणि कार्टून नेटवर्क स्टुडिओज यांचे विलीनीकरण होणार आहे. यामुळे कार्टून नेटवर्क हे चॅनल संकटात सापडले आहे. तसेच कंपनीने कार्टून नेटवर्कमधील बरेच कार्मचारी कमी केले असल्याने चॅनलच्या भवितव्याबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. त्यातून RIP Cartoon Network हा ट्रेंडही ट्विटरवर सुरू झाला आहे.
सध्या तरी कार्टून नेटवर्कच्या आऊटपूटमध्ये कोणताही बदल होणार नाही, असा खुलासा जरी कंपनीने केला असला तर ट्विटरवरील अनेक युजर्सना यावर विश्वास बसलेला नाही.
स्कूबी डू, पिंगू, टॉम अँड जेरी असे किती तरी प्रसिद्ध कार्टून प्रोग्रॅम या चॅनलवर दाखवले गेलेत. लहानपणी यातील एखादी कार्टून फिल्म पाहिलेली नाही, असा व्यक्ती सापडणे मुश्किलच. आताच्या मुलांना मनोरंजनासाठी विविध माध्यमं उपलब्ध आहेत, जी पिढी आता मध्यम वयात पोहोचली आहे, त्यांचे भावविश्व एकेकाळी कार्टून नेटवर्कने समृद्ध केले होते, हे मात्र कुणीही मान्य करेल. त्यामुळे कार्टून नेटवर्कवरील गंडांतर अनेकांना रुचलेले नाही.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार ने दिलेल्या बातमीनुसार Warner Bros. Television Group ने एकूण ८२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्या ४५ रिक्त जागा आहेत, त्यावर भरती केली जाणार नाही.
LetsCinema या ट्विटर हँडलवर या विलीनीकरणामुळे Cartoon Network बंद होणार आहे, असे म्हटले आहे.
Cartoon Network TV channel is shutting down its services after 30 years. The company will be merged with Warner Bros. to create digital content. pic.twitter.com/4vLuYsUyJV
— LetsCinema (@letscinema) October 14, 2022
तर झी टिव्हीने दिलेल्या वृत्तात चॅनल बंद होणार नसल्याचे म्हटले आहे. “ही बातमी अचूक नाही. कर्मचारी जरी कमी केले असले तरी चॅनल उपलब्ध राहाणार आहे, असे Warner Bros. Discovery ने म्हटले आहे,” असे झी टिव्हीच्या बातमीत म्हटले आहे.
हेही वाचा