बेळगाव : पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या ताब्यात येईल; आप्पाचीवाडीत नाथांची भाकणूक

बेळगाव : पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या ताब्यात येईल; आप्पाचीवाडीत नाथांची भाकणूक

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : मधुकर पाटील श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी, ता. निपाणी येथे महाराष्ट्र-कर्नाटकासह गोवा व आंध्रप्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी पहाटे नाथांची मुख्य भाकणूक झाली. वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोणे (महाराज) यांच्या उपस्थितीत चिरंजीव सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक कथन केली.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या यात्रेला मर्यादा आल्या होत्या. दरम्यान, यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असून भाविकांचा उत्साह या यात्रेने द्गुविणीत झाला आहे. शुक्रवार या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी दिवसभर नैवेद्य व श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतला. शनिवार दि. १५ रोजी उत्सवस्थळी बसलेली पालखी सायंकाळी उठल्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.

नाथांच्या भाकणुकीतून यंदा नवीन भविष्यवाणी कथन करताना सिध्दार्थ डोणे, महाराज म्हणाले, जाती-धर्म बिघडून जात वैरत्व वाढेल व हाणामाऱ्या होतील. भारत-पाक सीमेवर रण धुमेल, यामध्ये मराठा सैनिक छातीची ढाल करून लढतील. पाकिस्तानचा चौथाही (कोना) भाग भारताच्या ताब्यात येईल. आणि भारत मातेचा जयजयकार होईल. सोयाबीन कडधान्य उदंड पिकलं, मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात जाईल. देशात समान नागरी कायदा येईल. आगामी वर्षाचा दिवस आनंदात दाविन, सोयाबीन कडधान्य उदंड पिकल, दीड एक महिन्याचे पीक येईल, जगातील तापमानाच्या उच्चांकात वाढ होवूनजंगलांना आग लागून वन्यजीव व औषधी वनस्पती नष्ट होतील. वस्त्रोद्योग अडचणीत येईल, सुताचा दलाल दिवाळ काढील. गोरगरीब जनता आनंदात व सुखी राहील, पाऊस पाण्यामुळे ऋतुमानात बदल होईल.

बहिण भावाच्या नात्याला कलंक लागेल. काँग्रेस पक्षात फूट पडेल. राजकारणात भगवा फडकेल, चीनचा भारतावर हल्ला होईल, असे सांगत नाथांनी धोक्याचा इशारा देत नाथांनी काही अंशी भक्तांना दिलासाही दिला. त्यामुळे सर्वसामान्यात समाधान पसरले असून यामुळेच नाथांच्या भाकणुकीवरचा दृढविश्वास सत्य घटनांमुळे अधिकच वाढत चालला आहे. अशाप्रकारे डोणे महाराजांनी भाकणूक कथन केली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news