सांगली : तासगाव येथे गुंतवणुकदारांना ५०० कोटींचा गंडा; विपुल पाटील नॉट रिचेबल | पुढारी

सांगली : तासगाव येथे गुंतवणुकदारांना ५०० कोटींचा गंडा; विपुल पाटील नॉट रिचेबल

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : येथील विपुल प्रकाश पाटील याने पिनॉमिक ट्रेडर्स नावाने कंपनी काढून वर्षात दुप्पट पैसे देण्याचे गुंतवणुकदारांना आमिष दाखवले. गुंतवणुकदारांकडून तब्बल ५०० कोटी रुपये उकळले. मात्र, आता गेल्या वर्षभरात विपुल पाटील त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे आक्रमक झालेल्या गुंतवणुकदारांनी विपुल पाटील याच्या घरासमोर आज (दि.४) धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, विपुल पाटील सध्या कोणाचाही फोन उचलत नाही. त्याच्या घरचेही कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नसल्याचे व दमबाजी करत असल्याचे गुंतवणुकदारांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button