सांगली : मोटरसायकल-कंटेनर अपघातात तरुण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी | पुढारी

सांगली : मोटरसायकल-कंटेनर अपघातात तरुण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

जत; पुढारी वृत्तसेवा : जत शहरातील विजापूर – गुहागर मार्ग लगतच्या सोलनकर चौकात भरधाव जाणाऱ्या कंटेनरने तिघांना चिरडले. यात एक तरुण जागीच ठार झाला. दोघे जण गंभीर जखमी झाले. सतीश (पप्पू) आप्पासाहेब माळी (वय २१, रा.छत्रीबाग रोड, जत) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.  मायाप्पा शिवाजी बर्वे (वय ३२) व सागर बाळू धाईगडे (वय २१, दोघेही रा. जवळा, ता सांगोला) हे  गंभीर जखमी झाले. जखमीवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सांगोला राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने सतीश माळी यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यावेळी सतीश व त्याचे मित्र हे शहरातून शेगावकडे जाणाऱ्या सांगोला राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने जात होते.  सतीश हे कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाले.

जखमी मायाप्पा बर्वे व सागर धाईगडे यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.  दोघेही मृत सतीशचे मित्र होते. कंटेनर चालक फरार झाला असून तपास पोलीस नाईक लक्ष्मण बंडगर करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button