सांगली : 'विकासकामांच्या निधीसाठी केव्हाही फोन कर', मुख्यमंत्र्यांचा रोहित आर. आर. पाटलांना शब्द | पुढारी

सांगली : 'विकासकामांच्या निधीसाठी केव्हाही फोन कर', मुख्यमंत्र्यांचा रोहित आर. आर. पाटलांना शब्द

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री आर. आर. पाटील हे माझे सहकारी होते. त्यांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मतदारसंघातील कोणत्याही विकास कामासाठी निधी हवा असेल तर थेट मला फोन करुन सांगायचे त्वरीत निधी देवू, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित आर. आर. पाटील यांना कोल्हापूर येथे दिला.

आमदार अनिल बाबर यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. कोल्हापूर विमानतळावर रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी रोहित पाटील यांच्याकडून मतदारसंघातील प्रस्तावित विविध विकासकामांच्या बाबतची माहिती घेतली. तसेच विकास कामांना निधी मिळण्यासाठी काही अडचणी येत असतील तर थेटपणे मला फोन करायचा किंवा येऊन भेटायचे असे सांगितले. दरम्यान, दौ-यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी तासगाव येथील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, सुरेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button