कोल्‍हापूर : २२ किमी पुराच्या पाण्यातून पोहत फडकविला तिरंगा; पंचगंगा विहार मंडळाचा साहसी उपक्रम | पुढारी

कोल्‍हापूर : २२ किमी पुराच्या पाण्यातून पोहत फडकविला तिरंगा; पंचगंगा विहार मंडळाचा साहसी उपक्रम

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा : पंचगंगा विहार मंडळाने स्‍वातंत्र्याचा अमृतमहोत्‍सव अनोख्या पध्दतीने साजरा केला. पंचगंगा नदीत पुराच्या पाण्यात बालिंगा पूल ते शिवाजी पूल हे २२ किलोमीटर पर्यंतचे अंतर २४ जणांनी पोहत जात पार केले. यासाठी त्‍यांना २ तास १५ मिनीटे इतका वेळ लागला.

सदर धाडसी मोहिमेचे आयोजन देशाच्या अमृतमहोत्‍सवी स्‍वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केले होते. या मोहिमअंतर्गत प्रशांत कदम, अभिजित भोईटे, रितेश डफळे, नागेश माने, दिलीप शेटे, तारे, योगेश जाबीलकर सुधीर पाटील, जितू वाळवेकर, प्रकाश रैनाक, निपून कोकितकर, अभिजित पाटील किसन चौगुले, राजू मगदूम, अनंत ससे, सूरज कौलजलगी, राजू पराडकर, उमेश परमेकर, विवेक बुचडे, ओंकार कारेकर, बाळू कोळी, टिंगरे, भोपळे, विशाल भोपळे, विलास पाटील, चंद्रकांत कागले यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा :  

Back to top button