सांगली: जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्‍ती | पुढारी

सांगली: जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्‍ती

सांगली;पुढारी वृत्तसेवा: सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी श्रीमती दीपा मुधोळ – मुंडे यांची नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. सध्या त्या संभाजीनगर येथे सिडकोच्या मुख्य प्रशासक (न्यू टाऊनशिप) कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची संभाजीनगर महापालिकेचे आयुक्‍त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुधोळ – मुंडे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.

शिक्षण, आरोग्य, स्त्रीभ्रूणहत्या या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. एप्रिल 17 पासून त्या औरंगाबाद येथील राज्य जीएसटी विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होत्या. जीएसटी प्रणालीची प्रभावीअंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. ई – वे बिल नियमाचे पालन न करणार्‍यांच्या विरोधात त्यांनी धडक कारवाई करीत मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला होता. यापूर्वी त्यांनी उस्मानबाद जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

हेही वाचा:

Back to top button