शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत चळवळ सुरु राहील : वैभव नायकवडी | पुढारी

शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत चळवळ सुरु राहील : वैभव नायकवडी

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी दुष्काळी जनतेचे संघटन करून पाण्याचे स्वप्न साकारले. आता पाणी आले आहे; पण ते सर्वांना मिळाले पाहिजे. अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी निधी मिळाला पाहिजे. त्यामुळे पुन्हा संघटित होऊन वेळप्रसंगी आपल्या हक्कासाठी धडक मारावी लागेल. शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळेपर्यंत चळवळ सुरूच राहील, असा इशारा पाणी परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिला. आटपाडीत आयोजित पाणी परिषद आणि कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. बाबुराव गुरव होते. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, चंद्रकांत देशमुख आदी उपस्थित होते.

Political Meme’s : बंडखोर आमदार गुवाहाटीत, मीम्सचा ‘पाऊस’ महाराष्ट्रात…

नायकवडी म्हणाले की, पाणी आल्यावर चळवळ थंडावून चालणार नाही. नागनाथ अण्णा नायकवडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि गणपतराव देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्षात त्यांचे स्वप्न साकारणे हीच खरी कृतज्ञता ठरेल. सर्व दुष्काळी जनतेला पाणी मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हाती आलेले पाणी टिकविण्यासाठी लढा द्यावा लागेल. त्यासाठी नवीन पिढीला बरोबर घेत संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रा. डॉ. बाबुराव गुरव म्हणाले की, पाण्यासाठी पिढी खर्ची पडली. पाणी आले आहे. आता फक्त टँकर बंद झाले आहेत. पण नागनाथअण्णा व सहकाऱ्यांचे पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले, तर तो कृतज्ञता सोहळा असेल.

Chandrakant Khaire : आता कार्यालये फोडायला मी जाऊ का ? : चंद्रकांत खैरेंचा पदाधिकार्‍यांना सवाल

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, बदलत्या शैलीनुसार पिकांना पाणी देण्याची पद्धत बदलली, आता पीक पद्धत बदलावी लागेल. लहरी सरकार आणि लहरी निसर्ग यावर शेती करायची आहे. पाणी आवर्तन निश्चित झाले. तर पद्धतशीर शेती करता येईल.
देशमुख यांनी चळवळीचे माध्यम कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली. नागनाथ अण्णांच्या स्मारकासाठी एक एकर जागा देण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रश्न सोडवण्यासाठी ही चळवळ गरजेची आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ, मालाला भाव मिळण्यासाठी आणि नागनाथ अण्णांचे जन्मशताब्दी वर्ष हे कृतज्ञता वर्ष म्हणून पुढील वर्षी पाणी परिषद भवानी हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन केले.

स्वागत प्रास्ताविकात प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी चळवळीच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रा. दादासाहेब ढेरे, शिवाजीराव पाटील, ॲड. सुभाष पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, प्रा. आर. एस चोपडे, चंद्रकांत देशमुख, अनिकेत देशमुख, शिवाजीराव काळुंगे आदीची भाषणे झाली. आभार सावांता पुसावळे यांनी मानले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button