केंद्र सरकारची लोकप्रियता वाढत आहे : देशमुख | पुढारी

केंद्र सरकारची लोकप्रियता वाढत आहे : देशमुख

रेठरे धरण पुढारी वृत्तसेवा : मोदी सरकारकडून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे या सरकारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.

रेठरेधरण (ता. वाळवा) येथे जलजीवन मिशन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, जगन्नाथ माळी, सागर खोत, डी. के. पाटील उपस्थित होते. योजनेसाठी तीन कोटी पाच लाख निधी मंजूर आहे. देशमुख म्हणाले, केंद्र सरकारने अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. त्या योजनांचा फायदा गरजू नागरिकांना व्हावा.

सम्राट महाडिक म्हणाले, भाजप सरकारने वाकुर्डे बुद्रुक योजनेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यामुळे ही योजना पूर्णत्वास येत आहे. परंतु काही मंडळी याचे श्रेय घेण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. परंतु लोकांना वस्तुस्थिती माहित आहे. यावेळी सागर खोत, जगन्नाथ माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संजय घोरपडे, सुदाम पाटील, उपसरपंच निलेश पाटील, प्रशांत पाटील, इंद्रजित पाटील, संदीप पाटील, तानाजी पवार, विकास पाटील, भगतसिंग देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button