यंदाही फुलणार पालखी रथ; 38 वर्षांची पुष्पसजावटीची अखंड परंपरा | पुढारी

यंदाही फुलणार पालखी रथ; 38 वर्षांची पुष्पसजावटीची अखंड परंपरा

आळंदी : पुढारी वृत्तसेवा: तुझे रूप चित्ती राहो, गोड तुझे नाम” असे म्हणत माउलींच्या रथावर पुष्पसजावट करण्याचे काम गेली 38 वर्षे अखंडपणे गरुड परिवार विनामूल्य सेवाव्रत म्हणून करत आहे. यंदाही ही परंपरा कायम राहणार असून तब्बल महिनाभर दररोज माउलींची पुष्पसजावट केली जाणार आहे. आळंदीचे माजी नगराध्यक्ष, अखिल भाजी मंडई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, संत भोजलिंग काका सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब भिकोबा गरुड यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. नानासाहेब हे माउलींचे निस्सिम भक्त होते.

त्यांनी सुरू केलेली परंपरा त्यांचे कुटुंबीय पुढे नेत असून गरुड परिवार गेली 38 वर्षांपासून आळंदीहून पंढरीस जाणार्‍या माउलींच्या पालखी रथास सुगंधी फुलांनी सजावट करण्याची सेवा करत आहेत. तब्बल 31 दिवस आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी व पुन्हा पंढरपूर ते आळंदी असा पालखीचा प्रवास असून, संपूर्ण पालखी रथास विविधरंगी सुगंधित फुलांनी सजविण्याचे काम ते नि:स्वार्थीपणे व स्वखर्चाने करताना दिसतात.

सातारा : व्यसनमुक्‍त युवक संघाची हुतात्मा स्मारक ते धावडशी पदयात्रा

सुमारे आठ ते दहा कामगार कारागीर पालखी रथ सजविण्यासाठी काम करत असतात. त्यांचा मोबदला व राहण्याची व्यवस्था करण्यात येते. गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन पहाटे पालखी पुढील मुक्कामाच्या ठिकाणी निघण्यापूर्वी जाई, जुई, मोगरा, लिली, गुलाब, गुलछडी या व अशा अनेक विविधरंगी फुलांचा वापर करून पालखी रथ सजविण्यात येतो. सुरुवातीला पहिले महाद्वाराला तोरण लावले जाते, मग पादुकांना मोगर्‍याचा हार घातला जातो, तद्नंतर रथाच्या सजावटीस प्रारंभ होतो. गरूड परिवाराकडून लोणंद येथे वारकरी बांधवांना पंगतही घालण्यात येते.

तीनही भाऊ परंपरा राखणार कायम

सोमवारी मध्यरात्री माउलींचे महाद्वार हे विविधरंगी सुगंधी फुलांनी सजविण्याचे काम हाती घेणार आहेत. मंगळवारी पहाटे तीन वाजता पालखी सजावट करण्यात येईल. तसेच पालखी आजोळ घरातील पहिला मुक्काम आटोपून पंढरीकडे मार्गस्थ होईल. त्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सजवली जाईल, असे सुदीप गरुड यांनी सांगितले. वडिलांचा हा सेवेचा वारसा यापुढेदेखील आम्ही तीन मुले प्रदीप, सुदीप आणि गणेश सुरू ठेवणार असल्याचे प्रदीप गरुड यांनी सांगितले.

हेही वाचा

कणकवली : जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; पिसेकामतेत दानपेट्या फोडल्या

पोस्टल कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू : संभाजीराजे

विधान परिषदेचा फैसला आज

Back to top button