सांगली : पलूस तालुक्यात सावंतपूर नवीन जिल्हा परिषद गट, राजकीय समीकरणे बदलणार

सांगली : पलूस तालुक्यात सावंतपूर नवीन जिल्हा परिषद गट, राजकीय समीकरणे बदलणार

पलूस, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या गटाची व पंचायत समितीच्या गणाची प्रारुप प्रभाग रचना गुरुवारी (दि. २) अधिकृत प्रसिध्द करण्यात आली. पलूस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एका सदस्यांची भर पडली आहे. अगोदर चार सदस्य असलेल्या सदस्यांची संख्या पाच असणार आहे. त्यात सावंतपूर जिल्हा परिषद हा एक गट वाढल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

तालुक्याची राजकीय स्थिती पाहिली तर  पक्षीय पातळीवर राजकीय शक्ती कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. दुधोंडी, कुंडल, सावंतपूर, अंकलखोप, भिलवडी या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांच्यात खऱ्या अर्थाने लढत राहणार आहे. काँग्रेसच्या तुलनेने इतर पक्षाची शक्ती कमी आहे. कुंडल गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ अधिक असून इतर पक्षाची शक्ती कमी दिसुन येते. दुधोंडी, सावंतपूर, अंकलखोप, भिलवडी या ठिकाणी काँग्रेसची ताकत जास्त आहे.

परंतु सध्या या ठिकाणी राष्ट्रवादी हे प्रबळ पक्ष म्हणून समोर येत आहे. पाठीमागील निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला सुरुंग लावत तालुक्यातील जि.प.च्या चार पैकी तीन जागेवरती विजय मिळविला होता. तर कुंडल गटावरती राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. यावेळी भाजपा सुद्धा आपली सर्व ताकत पणाला लावणार आहे.

दुधोंडी गटातील दह्यारी, तुपारी ही गावे आता कुंडल गटाला तर सावंतपूर स्वतंत्र गट तयार झाला आहे. अंकलखोप गटातील बुर्ली गाव दुधोंडी गटाला जोडले आहे. कुंडल गटातील मोराळे, बांबवडे, सांडगेवाडी व अंकलखोप गटातील आमनापूर, अनुगडेवाडी, विठ्ठलवाडी ही गावे नवीन झालेल्या सावंतपूर गटाला जोडलेली आहेत व अंकलखोप गटाला भिलवडी गटातील भिलवडी स्टेशन, तावदरवाडी ही गावे जोडलेली आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच पलूस तालुक्यात आडाखे आखले जात आहेत. यातून कोणती गावे कुठल्या गटात होती आणि आता कुठल्या गटात गेली यामुळे त्या गटावर काय परिणाम होईल अशा चर्चांना उधाण आले आहे.

नवीन प्रारूप प्रभाग रचनेनुसार तयार झालेले जि.प गट पुढील प्रमाणे –

  • कुंडल जि.प गटात – तुपारी, दह्यारी, घोगाव, कुंडल, आंधळी
  • दुधोंडी जि.प गटात – दुधोंडी, पुनदी, पुनदीवाडी, नागराळे, रामानंदनगर, बुर्ली
  • सावंतपूर जि.प गटात – मोराळे, बांबवडे, सांडगेवाडी, सावंतपूर, आमनापूर, अनुगडेवाडी, विठ्ठलवाडी
  • अंकलखोप जि.प गटात – राडेवाडी, सूर्यगाव, नागठाणे, अंकलखोप, तावदरवाडी, बुरुंगवाडी, भिलवडी स्टेशन
  • भिलवडी जि.प गटात – खंडोबाचीवाडी, हजारवाडी, भिलवडी, माळवाडी, चोपडेवाडी, सुखवाडी, खटाव ब्रह्मनाळ, वसगडे

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news