Shakira Breakup : पॉप सिंगर शकीराचे ब्रेकअप! ‘या’ जगप्रसिद्ध फुटबॉलरने दिला धोका

Shakira Breakup : पॉप सिंगर शकीराचे ब्रेकअप! ‘या’ जगप्रसिद्ध फुटबॉलरने दिला धोका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर शकीरा (Shakira Breakup) सध्या खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने तिचा पार्टनर आणि प्रसिद्ध स्पॅनिश फुटबॉलर जेरार्ड पीकेसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. शकीरा आणि जेरार्ड 2010 पासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. हे जोडपे दोन मुलांचे पालकही आहेत. मात्र, आता दोघांनी 12 वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या विभक्त होण्यामागे जेरार्डचे अफेअर असल्याची जोरदार चर्चा आहे.

शकीरा (Shakira Breakup) आणि तिचा जोडीदार जेरार्ड पिके अनेक आठवड्यांपासून वेगळे राहत आहेत. पत्रकार एमिलियो पेरेझ डी रोजास यांनी याबाबत खुलासा केला आहे. रोजास यांनी दावा केलाय की, पॉपस्टार शकीराने काही आठवड्यांपूर्वी जेरार्डचा दुसऱ्या महिलेसोबतचा फोटो पाहिला. यानंतर शकीरा भडकली. यातून तिचा जेरार्डसोबत वाद झाला. ज्यामुळे कथित ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे.

शकीरा जेरार्डपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. शकीराचा जन्म कोलंबियामध्ये 1977 मध्ये झाला असून जेरार्ड पिकेचा जन्म 1987 मध्ये स्पेनमधील बार्सिलोना शहरात झालाय. शकीरा आणि जेरार्ड हे दोघे विवाहित नसूनही त्यांना दोन मुले आहेत. 2010 च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे वाका-वाका या गाण्याच्या शूटिंगदरम्यान शकीरा आणि जेरार्ड यांची पहिली भेट झाली होती. (Shakira Breakup)

शकीराने वाका-वाका या गाण्याला आवाज दिला होता. तसेच या गाण्यात जेरार्ड पिकेही दिसला होता. 35 वर्षीय जेरार्ड बार्सिलोनाचा मुख्य बचावपटू राहिलेला नाही. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत जेरार्डने स्पेनला प्रथमच विश्वविजेते बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news