महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतींना परवानगी द्यावी; तासगावात मोर्चा

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतींना परवानगी द्यावी, अशी मागणी करत बैलगाडी चालक – मालकांनी तासगावात मोर्चा काढला. महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत सुरू करावी. खिलार गोवंश वाचविण्यासाठी अनुदान देण्यात द्यावे, आदी मागण्यांसाठी बैलगाडी चालक-मालक आणि शर्यत शौकिन संघटनेने बैलगाड्यासह तासगाव तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
- ऑलिम्पिक पदकवीर श्रीजेश याचा धोतर, शर्ट व १००० रुपये देऊन सत्कार
- सोनाक्षी सिन्हा म्हणजे दीपिकाची कॉपी कॅट?
तहसीलदारांना निवेदन
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. बियाणे आणि खतांचे दर भरमसाठ वाढलेले आहेत.
बैलगाडी शर्यत बंद असल्याने त्यावरती अवलंबून असलेले कासरे विकणारे, गुलालवाले, टेंम्पोवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
या संकटातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी बैल खरेदीसाठी अनुदान द्यावे. राज्य सरकारने वन्यप्राणी, पक्षी याप्रमाणे जुंपणीच्या जनावरांची यादी जाहीर करावी. राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारमान्य पशू प्रदर्शने भरवावीत.
अधिक वाचा –
- राज्यात विजेची मागणी वाढताच महानिर्मितीचे तत्पर योगदान
- अपघात: साताऱ्यातील अपघातात अनेगा वडा सेंटरच्या मालकाच्या मुलाचा मृत्यू
कत्तलखान्यात गाय, वासरे, बैल कापण्याची परवानगी देऊ नये. जर असे प्रकार आढळले तर कठोर कारवाई करण्यात यावी. बैलांचे आरोग्य जोपासण्यासाठी सर्वोतपरी मदत करावी.
यावेळी अर्जुन थोरात, काँग्रेसचे तालुकध्यक्ष महादेव पाटील, भाजप युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष दिग्विजय पाटील, संदेश भंडारे, स्वप्निल जाधव, कमलेश तांबेकर, करण पवार, बाळासो पवार, सागर लिंबळे, तात्यासाहेब पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचलं का ?