जत : जाडरबोबलाद येथे सोसायटीच्या प्रचार सभेत दगडफेक; पोलीस अधिकारी जखमी | पुढारी

जत : जाडरबोबलाद येथे सोसायटीच्या प्रचार सभेत दगडफेक; पोलीस अधिकारी जखमी

जत; पुढारी वृत्तसेवा : जाडरबोबलाद (ता. जत) येथे सर्व सेवा सोसायटीची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी एका गटाने आयोजित केलेल्या प्रचारसभेत अडथळा आणण्यासाठी दुसऱ्या गटाने दगडफेक केली. ही घटना गुरुवारी (दि.26) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी शांततेचे आवाहन करताच पोलिसांवर दुसऱ्या गटाने दगडफेक केल्याने यात एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. याबाबत रात्री उशिरा कोणताही संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जाडरबोबलाद येथे सर्व सेवा सोसायटीची निवडणूक सुरू आहे. या ठिकाणी अत्यंत चुरशीची निवडणूक होत आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातूनच माजी जिल्हा परिषद सभापती तम्मणगौडा रवि पाटील यांच्या सुरू असलेल्या प्रचार सभेत अडथळा आणण्यासाठी विरोधी गटातील काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यावेळी घटनास्थळी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी यांना दगड लागून जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा

Back to top button