राजू शेट्टी : सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्या ! | पुढारी

राजू शेट्टी : सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्या !

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी सोयाबीनचे पीक बोगस बियाण्यामुळे वाया गेले असून तीन जिल्ह्यातील जवळपास ३ हजार हेक्टरहून अधिक सोयाबिन उत्पादक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

अनिल बाबर : “महाविकास आघाडी टिकवायची असेल, तर आमचं ऐकून घेतलं पाहिजे”

वास्तविक पाहता सोयाबीनची ७२६ ही जात जास्त उन्हामुळे उताऱ्यावर परिणाम करत असून पावसाळ्यामध्ये याची उत्पादकता चांगली येते. सध्या तीन्ही जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे सरासरी हेक्टरी ३ क्विंटल पर्यंत उत्पादन निघाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Inflation : महागाई गेल्या 8 वर्षातील उच्चांक पातळीवर! किरकोळ बाजारात भडका

शासनाच्या महाबीज मंडळाकडून या बियाण्याचे वाटप करत असताना जादा तापमानात सदर पिकाचे उत्पादन येत नसल्याचे शेतक-यांना सांगणे गरजेचे होते. मात्र महाबीजमध्ये बसलेल्या पांढरपेशी अधिका-यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने तातडीने या सर्व सोयाबीन उत्पादकांचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

नक्की वाचा….

Back to top button