सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाची धुरा सक्षमपणे संभाळत आहेत : डॉ. प्रमोद सावंत | पुढारी

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाची धुरा सक्षमपणे संभाळत आहेत : डॉ. प्रमोद सावंत

पलूस (सांगली), पुढारी वृत्तसेवा : औदुंबर  ता. पलुस येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दर्शनासाठी आले होते. यावेही भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी आ. पृथ्वीराज देशमुख प्रमुख उपस्थित होते. दत्त मंदीरात मुख्यमंत्री यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मंदीर व्यवस्थापनाच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला.

दर्शनानंतर प्रमोद सावंत यांनी अंकलखोप येथील भाजपा कार्यालयात सदिच्छा भेट दिली. आणि येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्‍हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाची धुरा सक्षमपणे संभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गोव्यात उत्तम कामगिरी सुरू आहे. गोवा राज्यासाठी चांगली सुस्थिती निर्माण व्हावी व त्यांना देशाचे नेतृत्व जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी व परत एकदा देशात मोदीजींना काम करण्याची संधी मिळावी, असे डॉ. प्रमोद सावंत म्‍हणाले.

याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील, प्रांतधिकारी गणेश मरकड, तहसिलदार निवास ढाणे, पोलिस उपविभागिय.अधिकारी अश्विनी शेंडगे, उद्योजक गिरीश चितळे,  उद्योजक प्रविण शेटे, सागर सुर्यवंशी, शंकर पाटील, तुषार पाटील, अमित चौगुले, डॉ. जयवर्धन पाटील,अप्पासो सावंत व भाजपाचे कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंकलखोप ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री सावंत यांचा विसर

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अंकलखोप गावाला सदिच्छा भेट दिली. २०१९ च्या महापुरानंतर अंकलखोप गावासाठी  सावंत यांनी भरीव मदत केली होती. परंतु या सदिच्छा भेटीवेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर अंकलखोप ग्रांमपंचायतीने त्यांचा सत्कार करणे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनचा ग्रांमपंचायतीला विसर पडल्याची चर्चा नागरिकांच्यात होती.

हेही वाचा  

Back to top button