सांगली : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणास २० वर्षांचा कारावास

इस्लामपूर , पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात केला. ही घटना बुधवारी (दि. २०) घडली होती. या प्रकरणी मोईन मोबीन अन्सारी (वय १९) रा. पेठवडगाव जि. कोल्हापूर याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी हातकणंगले तालुक्यातील असून घटनेदिवशी ती शिराळा तालुक्यातील मामाच्या गावी सुट्टीला आली होती. ती गावातील यात्रेत गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला फूस लावून पुण्याला पळवून नेले. तिथे त्याने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. आणि याबाबत कोणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या आईने शिराळा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली होती.
या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करुन येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायाधीश एस.एम. चंदगडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अँड. शुभांगी पाटील यांनी युक्तीवाद केला. यामध्ये एकूण ९ साक्षीदारांना तपासण्यात आले. याप्रकरणी आरोपी मोईन अन्सारी याला दोषी धरुन न्यायालयाने बलात्कार व बाललैंगीक अत्याचार कायद्याअंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १००० रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा
- ‘मातोश्री’वर येवून दाखवाच, किशोरी पेडणेकर यांचे खुले आव्हान
- मिरज : मराठा क्रांती मोर्चाची पोलिसांत धाव ; अॅड. सदावर्ते यांच्याविरुद्ध तक्रार
- पुणे : संदीप कर्णिक यांनी स्वीकारला सहआयुक्त पदाचा कार्यभार