पुणे : संदीप कर्णिक यांनी स्वीकारला सहआयुक्त पदाचा कार्यभार | पुढारी

पुणे : संदीप कर्णिक यांनी स्वीकारला सहआयुक्त पदाचा कार्यभार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्य गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर संदीप कर्णिक यांनी पुणे शहर सह पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार शुक्रवारी सायंकाळी स्वीकारला. त्यांनी मावळते सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

कोरोना अपडेट | देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत २,४५१ नवे रुग्ण, ५४ मृत्यू

पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी कर्णिक यांची पुणे सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्णिक हे (पश्चिम प्रादेशिक विभाग) बृहन्मुंबई येथे अपर पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांना आता पुणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर, शिसवे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

हेही वाचा

जम्मूमध्ये भीषण चकमक; ४ दहशतवादी ठार, तर १ जवान शहीद

Hijab Row : कर्नाटकात हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना १२ वी परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारली

देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांना लुटले, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांचा हैदोस

Back to top button