खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी स्वाती टिंगरे यांची निवड | पुढारी

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी स्वाती टिंगरे यांची निवड

विटा; पुढारी वृत्तसेवा: खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी स्वाती राजेंद्र टिंगरे यांची निवड करण्यात आली आहे. त्या आमदार अनिल बाबर यांच्‍या समर्थक आहेत. या निवडीनंतर आमदार अनिल बाबर आणि खानापूर जनता विकास आघाडीचे नेते सुहास शिंदे सुहास शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

खानापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष तुषार मंडले यांनी कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवारी नगरपंचायत सभागृहात पार पडली.

अधिक वाचा 

नगराध्यक्षपदी स्वाती टिंगरे यांची निवड

बिनविरोध पार पडलेल्या निवडीत आमदार अनिल बाबर समर्थक स्वाती राजेंद्र टिंगरे यांची निवड करण्‍यात आली. खानापूर नगरपंचायतीमध्‍ये आमदार अनिल बाबर आणि सुहास शिंदे समर्थक गटाची संयुक्त सत्ता आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गचे आरक्षण असल्याने तुषार मंडले हे नगराध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ संपल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला होता.

अधिक वाचा 

त्यानंतर ही निवडणूक उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी आश्विनी माने- पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

पांडुरंग डोंगरे, तुषार मंडले, भारती माने, अमोल मोरे, राजेंद्र शिंदे, नगरसेविका डॉ. वैशाली हजारे, मंगल मंडले, नूतन टिंगरे, सुनीता भगत, रेखा कदम, उमेश थेंडे उपस्थित होते. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आतषबाजी करत जल्लोष केला.

अनिल बाबर म्हणाले, खानापूर नगरपंचायतच्या माध्यमातून विकासास मोठा वाव आहे. खानापूर भागात टेंभूचे पाणी आलेले असल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने बाजारपेठ पण चांगली फुलेल. आता राष्ट्रीय मार्ग झाल्याने बाजारपेठ सुधारणे गरजेचे आहे. यासाठी नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.

अधिक वाचा 

खानापूर नगरपंचायतचा आराखडा चांगल्या प्रकारे करावा लागेल. त्यासाठी दूरदृष्टीने धोरण ठरवावे. नगरपंचायतची टोलेजंग इमारत उभी राहावी. तसेच शहरातील सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने व्हावेत, यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करू, असेही बाबर यांनी सांगितले.

अनिल बाबर आणि सुहास  शिंदे यांनी नगर पंचायतच्या माध्यमातून शहराची सेवा करण्याची संधी दिली आहे. ज्या गतीने मागील पदाधिकाऱ्यांनी शहराचा विकास केला आहे. त्याच गतीने शहर विकासासाठी योगदान देणार असल्‍याचे असे नूतन नगराध्यक्षा स्वाती टिंगरे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button